जेईई मेन परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जेईई मेनची तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलै पासून २५ जुलै पर्यंत होईल. तर, जेईई मेन चौथ्या टप्प्यातील परीक्षा जी मे महिन्यात होणार होती, ती २७ जुलै पासून २ ऑगस्ट २०२१ पर्यंत होईल अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
मी अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला धन्यवाद देऊ इच्छित आहे. याशिवाय एनटीए ने या तिन्ही दिवसांच्या आत परीक्षा केंद्र बदलण्याची देखील संधी दिली आहे. यामुळे आपल्या सोयीनुसार या तीन दिवसांच्या आत बदल करता येणार आहे.
अर्ज करण्याची संधी
जे विद्यार्थी काही कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत, त्यांना अर्ज करण्यासाठी एक संधी दिली जात आहे. त्यानुसार आता आज ६ जुलै रात्रीपासून ८ जुलै २०२१ पर्यंत रात्री ११.५० पर्यंत अर्ज करता येणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी ९ जुलै पासून ११ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.