Mumbai

‘त्या’ फोटोत शाहरुखची बायको नाही? मग ती कोण? पाहा काय आहे फोटोचं वास्तव?

Published by : Lokshahi News

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) ह्या अनंतात विलीन झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती.

लता दीदींच्या अंत्यविधीत जे काही दिसले तो चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मिडियावर यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. शाहरुख खान. (Shahrukh Khan) देखील लता दीदींच्या अंतसंस्कारासाठी आला होता. त्याने लता दिदींचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळेस जे काही घडले त्यानं वाद विवाद होताना दिसत आहे. वाद विवादासोबत त्याचं कौतूकही केलं जातंय.

लता दीदींच्या अंत्यदर्शन घेताना शाहरुखनं आधी दुवा पढली नंतर हात जोडून दिदींचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळेस त्यानं इस्लाम धर्माच्या  प्रथेनुसार फुंकरही घातली. त्यावरुन वाद झोत उठली आहे. यात शाहरुखचा एक फोटो व्हायरल होतोय. यात तो दुवा मागतोय तर त्याच्यासोबत पांढऱ्या सदऱ्यात एक महिला आहे जी त्याची बायको गौरी खान (Gauri Khan) म्हणून व्हायरल होत आहे. मात्र ती हिंदू धर्माप्रमाणे हात जोडून अंत्यदर्शन घेतेय.

ह्या फोटोत शाहरुख खान आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खान हे लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेत असल्याचं दाखवलं गेलंय. त्याला कारण आहे ते अंत्यदर्शन घेताना दोघांनी पाळलेला आपआपला धर्म. हा फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मि्डियावर चर्चा आहे आम्हाला आमचा भारत कसा हवा तर तो ह्या फोटोतल्यासारखा. जिथं नवरा बायको वेगवेगळ्या धर्माचे असले तरी आप आपल्या धर्माचं पालन करतात. मात्र काही जणांनी हा फोटो शेअर करताना खातरजमा केलेली नाही की, फोटोत दिसणारी ती व्यक्ती नेमकी कोण आहे? पडताळणीत असे लक्षात आले की, ती शाहरुख खानची पत्नी गौरी खान नसून त्याची मॅनेजर पुजा ददलानी आहे. पण बहुतांश जणांनी शाहरुख आणि पुजा ददलानीचा फोटो हा नवरा बायकोचा फोटो म्हणून व्हायरल केलाय.

पुजा ददलानी ही शाहरुख खानची मॅनेजर असून ती आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आली होती.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी