२०२१ आयपीएल प्ले ऑफमध्ये तीन संघांनी आपले स्थान पक्के केले आहे.चौथ्या स्थानासाठी चुरस कायम आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ मैदानात उतरले असून नेमकी बाजी कोण मारनार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.
आयपीएल १४व्या हंगामात प्ले ऑफमध्ये चन्नई सुपर किंग पहिल्या स्थानी, दिल्ली दुसऱ्या स्थानी आणि बँगळूरु तिसऱ्या स्थानी आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ उतरले असून नेमकी बाजी कोण मारनार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.कोलकाता नाईट रायडर्सकडे १२ गुण आहेत आणि त्यांची अजून एक लढत बाकी आहे.तर एका बाजूला मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांचे एकुण १० गुण आहेत.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांकडे आता दोन लढत बाकी असून त्यांना या दोन्ही लढत जिंकणे गरजेचे आहे.मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स तसेच कोलकाता नाईट रायडर्सने येणारी लढत हरली आणि मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांनी एक लढत जिंकली तर कोलकाता नाईट रायडर्स ,मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या तीनही संघाचे १२ गुण होतील.आणि हे गुण केकेआर संघाला टक्कर देण्या इतके असेल.
केकेआर आणि राजस्थान रॉयल्स याची लढत ७ ऑक्टोंबर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे, तरी केकेआर ह्या संघाला प्ले ऑफमध्ये उतरण्यासाठी अजून २ गुणांची आवश्यकता आहे. तर पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग यांची लढत ७ ऑक्टोंबर दुपारी ३:३० वाजता होणार आहे. राजस्थान रॉयल्स या संघाची लढत ४ ऑक्टोंबर आणि ७ ऑक्टोंबर या दिवशी होणार आहे.मुंबई इंडियन्स या संघाची लढत देखील ४ ऑक्टोंबर आणि ८ ऑक्टोंबरया दिवशी होणार आहे. या तीनही संघाला एकूण ४ गुणांची आवश्यकता असून प्ले ऑफमध्ये कोण चौथी जागा पटकावतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.