कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांनवर ३१ जुलै पर्यंत बंदी घातली आहे. नागरी विमानवाहतुक महासंचालयाने आंतरराष्ट्रीय उड्डानावरच्या बंदीला एका महीन्यासाठी वाढवले आहे.
मात्र, काही मोजक्या मार्गांवरील काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. २३ मार्च २०२०रोजी आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
नागरी विमानवाहतुक महासंचालयाने ट्विटवर पोस्ट केलेल्या पत्रात असे सांगितले कि, ३१ जुलै २०२१ च्या रात्री ११:५९ वाजे पर्यंत आंतराष्ट्रीय प्रवासी वाहुतुकिवर बंदी कायम राहील. पण भारताने अनेक देशांशी हवाई बबल करार केला आहे. या करारनुसार भारताने विविध उड्डाने चालु ठेवली आहेत.
भारताने अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमीरात, केनिया, भूटान आणि फ्रान्स सहित 27 देशांसोबत एअर बबल करार केला आहे. दोन देशांच्या दरम्यान एअर बबल पॅक्ट अंतर्गत त्यांच्या विमान कंपन्या त्यांच्या प्रदेशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवू शकतात.