India

गुप्तचर यंत्रणेकडून भारताला अलर्ट जारी

Published by : Lokshahi News

गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) भारताला अलर्ट जारी केला आहे. भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे. गुप्तचर संस्थेनं जारी केलेल्या अलर्टनुसार, IS KP या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षित दहशतवादी (Terrorist Attack) भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवादी संघटनेच्या उच्च कमांडनं भारतात उपस्थित असलेल्या त्याच्या स्लीपर सेलशी संपर्क साधला आहे. भारतात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना IED बनवण्यासाठी आणि लहान शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे. त्याचदरम्यान गुप्तचर अहवालांनुसार, IS च्या ठिकाणांमध्ये उजव्या विचारांचे नेते, धार्मिक स्थळे, पाश्चात्य देश आणि गर्दीची ठिकाणे यांचा समावेश आहे.

तसंच ते परदेशी लोकांना लक्ष्य करू शकतात. गिलानींना श्रद्धांजली वाहताना इम्रान खान यांचं वादग्रस्त ट्विट, ओकली गरळ दहशतवादी संघटनांना बळ मिळेल दुसरीकडे, अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तेथे दहशतवाद वाढण्याचा धोका वाढला आहे. म्हणूनच अफगाणिस्तानमध्ये एका सरकारची नितांत आवश्यकता आहे. असं मानलं जातं की, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानं जगभरात अशांतता निर्माण होऊ शकते.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय