भारतीय नौदलाच्या डिझाईन संचालनालयाने विमानवाहू जहाजाची बांधणी केले आहे. स्वदेशीविमानवाहू'विक्रांत' हे जहाज वाहतूक मंत्रालय अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कोचीन लिमिटेड येथे बांधले जात आहे. आयएसी हे ७६ % पेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीसह "आत्म निर्भर भारत" साठी एक प्रमुख उदाहरण आहे. भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्डचा स्वदेशी बनावटीचा आणि विमानवाहक वाहक तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
हे जहाज २६२ मीटर रुंद असून त्याची उंची ५९ मीटर आहे.त्यात १४ डेक असून त्यात २३०० विभाग आहेत.या लढाऊ विमानचं काम १७०० कामगारानी पूर्ण केले आहे. स्ञी अधिकार्यांसाठी विशेष कार्यालयही तयार करणार आहेत.अत्याधुनिक वेपन्स ने हे जहाज तयार केले आहे.विक्रांत जहाजाला स्पीड सुमारे 28 नॉट्स आणि क्रूझिंग स्पीड 18 नॉट्स आहे आणि सुमारे 7,500 नॉटिकल मैल शक्ती आहे.
जहाजाच्या बांधकामाची बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत आणि जहाज चाचण्यांच्या टप्प्यात तयार झाले आहे. 20 नोव्हेंबरला ट्रायल्सचा एक भाग म्हणून बंदरामध्ये जहाजाच्या प्रोपल्शन आणि पॉवर जनरेशन उपकरण/ सिस्टीमच्या तयारीची चाचणी घेण्यात आली.