भारताच्या नौदलात आता आयएनएस करंज या पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईमधील माझगाव या बंदरावर या पाणबुडीचे अधिकृतपणे जलावतरण करण्यात आलं. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं या पाणबुडीची उभारणी केली आहे.
या कार्यक्रमादरम्यान नौसेना प्रमुख नौसेना प्रमुख करमबीर सिंह यांनी नौसेने मागील 7 दशक भारत स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भर भारताचे समर्थन करत आहे. सध्या भारतीय नौसेने 42 जहाज आणि 40 पाणबुड्यांची निर्मिर्ती केली आहे. अशी माहिती दिली.
पाणबुडीच्या पृष्ठभागावरुन पाण्याच्या आत लक्ष्यभेद करण्याची या क्षमता आहे. शत्रूला हूल देऊन अचूक नेम साधणे या पाणबुडीचं वैशिष्ट्य आहे. टॉरपेडो आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांद्वार देखील ही पाणबुडी हल्ला करु शकते.