लोकशाही न्यूज नेटवर्क
कृषी कायद्यावरुन शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. भारताची लोकशाही ही पाश्चिमात्य संस्था नाही तर एक मानवी संस्था आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लोकशाहीवर शंका घेणाऱ्यांना आणि परदेशी सेलिब्रेटिंना टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना म्हणाले की, "भारतीय लोकशाहीवर जे लोक शंका घेतात आणि भारताच्या या मुलभूत शक्तीवर ज्यांना शंका आहे. त्यांना मी विशेष आग्रहाने सांगेन की, भारताची लोकशाही समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. भारताची लोकशाही ही कोणत्याही प्रकारे पाश्चिमात्य संस्था नाही, तर ती एक मानवी संस्था आहे. भारताचा इतिहास लोकशाही संस्थांच्या उदाहरणांनी भरलेला आहे." यासोबतच नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण तन-मन-धनाने मूलतः लोकशाहीवादी असल्यानेच भारत एक लोकशाही राष्ट्र आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
भारताचा राष्ट्रवाद हा संकीर्ण, स्वार्थी आणि आक्रमकही नाही. हा सत्यम शिवम सुंदरमंच्या मुल्यांनी प्रेरित आहे, असं नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं. जग आपल्याला एखादा शब्द देतं आणि आपणही तो शब्द घेऊन चालत राहतो, याचं मला कधीकधी आश्चर्य वाटतं.