भारतीय जवानांच्या तर्कतेमुळे दहशतवाद्यांकडून उरीसारखा मोठा हल्ला पुन्हा करण्याचा कट उधळण्यात यश आले आहे. मंगळवारी, उरी नियंत्रण रेषेजवळून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तान दहशतवाद्यांशी भारतीय जवानांची चकमक झाली.
या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं तर एका १९ वर्षांच्या 'लष्कर ए तोयबा'शी संबंधित दहशतवाद्याला जिवंत अटक करण्यात आलीय. या दहशतवाद्याचं नाव बाबर असून तो पाकिस्तानी नागरिक असल्याचं समजतंय. पाकिस्तानात ट्रेनिंग मिळात असून यासाठी 20 हजार रुपये मिळायाची अशी कबुली अली केली आहे.