भारतासह जगाला कोरोनाचा विषाणू देणाऱ्या "फादर ऑफ कोरोना" या चीनने भारतालगत लडाख प्रांतात पुन्हा कुरापतींना सुरुवात केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, चिनी हवाई दलाच्या 20 हून पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी पूर्व लडाख भागाजवळ झालेल्या युद्ध सरावात भाग घेतला होता. हा सराव संवेदनशील असल्याचे कारण म्हणजे, ज्या ठिकाणी गेल्या वर्षी चीननं लडाखमध्ये आपल्या सैनिकांना मदत पोहोचवली होती, त्याचं एअर बेसवरून हा युद्धाभ्यास करण्यात येतोय.
भारतानेसुद्धा आक्रमक पवित्रा घेत उत्तरेकडील सीमेवर राफेलसह लढाऊ विमानांचा ताफा सक्रिय केला. भारताची नजर लडाख समोरील चिनी सीमेतील काशगर, होतान, न्यिंगची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअर बेसवर आहे. भारताचे लढाऊ विमानं देखील एलएसीवर सराव करताना दिसून आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिनजियांग आणि तिब्बत भागातील 7 चीनच्या सैन्य ठिकानांवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाद्वारे लक्ष ठेवलं जातंय. यासाठी इतरही पद्धतीचा भारतीय सैन्य दलाकडून वापर केला जातोय. उन्हाळ्यात दरवर्षी चिनी सैन्य सराव करतं. त्याची पूर्व सूचना औपचारिकरीत्या ज्या देशांच्या सीमांवर सराव केला जातो त्यांना दिली जाते. मात्र, यंदा सराव आणि सामान्य उड्डाणाशिवाय चीनकडून अक्रमकता दाखवल्याचं चित्र आहे.
यापूर्वी भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाल्या आहेत. तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी होत असताना चिनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या आहेत.