Uncategorized

IND vs NZ 1st Day | पहिल्या दिवसअखरे भारताच्या ४ बाद २५८ धावा

Published by : Lokshahi News

न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताने प्रथम फलंदाजी करत दिवसअखेर २५८ धावांचा पल्ला गाठला आहे. श्रेयस अय्यरने नाबाद 75 धावा केल्या आहेत तर रवींद्र जडेजाने अर्धशतक पुर्ण केले आहे. या जोडीच्या बळावर भारताच्या ४ बाद २५८ धावा पुर्ण झाल्या आहेत. पहिल्या दिवसावर भारताची पकड असल्याचं दिसून आलं.

पहिला सामना आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू होत आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाची करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला पहिला धक्का मयंक अग्रवालच्या रूपात मिळाला. तो काईल जेमसनचा बळी ठरला. मयंकने २८ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा केल्या.शुभमन गिलने ८१ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने २७ षटकांनंतर एक विकेट गमावून ८० धावा केल्या होत्या. लंच ब्रेकपर्यंत ५२ धावांवर नाबाद राहिलेल्या शुभमन गिलने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. काइल जेमिसनने दुसरी विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याआधी डावाच्या आठव्या षटकात जेमिसनने १३ धावांवर मयंक अग्रवालकडे यष्टिरक्षकाकडे झेलबाद केले. भारताने ८२ धावांवर दुसरी विकेट गमावली.

दुसऱ्या सत्रात शुभमन गिलची विकेट गमावल्यानंतर भारताने शंभरी पार करताच चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. पुजाराने टीम साऊथीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी २६ धावांचे योगदान दिले. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पदार्पण करणारा श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आहे. रहाणेने ६३ चेंडूंत ६ चौकारांसह ३५ धावा केल्या. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १४५ धावा होती. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यरने जोडीनं भारताचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर (७५) आणि रवींद्र जडेजा (५०) धावा केल्या. त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताची पकड असल्याचं दिसून आलं.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news