टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून भारताने प्रथम फलंदाजी करत दोनशे धावांचा टप्पा पुर्ण केला आहे. यासह श्रेयस अय्यरनं पदार्पणातचं अर्धशतक झळकावलं आहेय.
पहिला सामना आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू होत आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाची करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला पहिला धक्का मयंक अग्रवालच्या रूपात मिळाला. तो काईल जेमसनचा बळी ठरला. मयंकने २८ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा केल्या.शुभमन गिलने ८१ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने २७ षटकांनंतर एक विकेट गमावून ८० धावा केल्या होत्या. लंच ब्रेकपर्यंत ५२ धावांवर नाबाद राहिलेल्या शुभमन गिलने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. काइल जेमिसनने दुसरी विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याआधी डावाच्या आठव्या षटकात जेमिसनने १३ धावांवर मयंक अग्रवालकडे यष्टिरक्षकाकडे झेलबाद केले. भारताने ८२ धावांवर दुसरी विकेट गमावली.
दुसऱ्या सत्रात शुभमन गिलची विकेट गमावल्यानंतर भारताने शंभरी पार करताच चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. पुजाराने टीम साऊथीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी २६ धावांचे योगदान दिले. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पदार्पण करणारा श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आहे.