ऑडी, मर्सिडीज-बेंज, जॅग्वारनंतर आता BMW देखील भारताच्या इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. कंपनीनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पुढील 6 महिन्यांत कंपनी आपल्या तीन इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारात आणणार आहे . याची सुरुवात पुढील महिन्यात 11 डिसेंबरपासून होणार असल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं. कंपनी 11 डिसेंबरला BMW iX ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. भारतात लॉन्च होणारी ही कंपनीची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल.
BMW च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनी यंदाच्या वर्षात भारतात एकूण 25 प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ विक्रम पावाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही प्रोडक्शन वेगानं पुढच्या टप्प्यावर नेणार आहोत. ज्यामुळं आम्ही प्युअर इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेनं पुढं पाऊल टाकू शकू." पुढे ते म्हणाले की, पुढच्या 180 दिवसांत भारतात बीएमडब्ल्यू तीन ऑल इलेक्ट्रिक प्रोडक्ट लॉन्च करणार आहे.