योगगुरू रामदेव बाबा यांनी अॅलोपेथी या वैद्यकीय शाखेबद्दल आक्षेपार्ह विधान करत हे दिवाळखोर विज्ञान असल्याचे म्हटलं होतं. यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला. आता येत्या १ जूनला देशभरातील डॉक्टर्स काळा दिवस साजरा करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरून योग गुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये (आयएमए) वाद सुरू आहे. निवासी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की, अॅलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाविरोधात 1 जून रोजी देशव्यापी निषेध करण्यात येणार असून हा काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे. तसेच, याबाबत बाबा रामदेव यांनी 'जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी', असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. आयएमएने यासंदर्भात १००० कोटींची अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.