Pashchim Maharashtra

शिक्षक परीक्षा घोटाळा प्रकरणी ‘या’ आयएएस अधिकाऱ्याला अटक

Published by : Lokshahi News

पुणे | शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलीसांनी सुशील खोडवेकर यांना आज दुपारी ठाण्यातून अटक केली. ते 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून ते कार्यरत होते. तर, शिक्षक भरती परीक्षेतील गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई केली आहे.

या प्रकरणातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. तसेच, आता खोडवेकर यांच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, हे देखील उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलीसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...