हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकला की काय असा प्रश्न आता साऱ्यांनाच पडलाय. ह्याचं कारण म्हणजे राजस्थानच्या फलंदाजांनी केलेली उत्कृष्ट फटकेबाजी.
राजस्थानची फलंदाजी:
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने एकूण 210 धावा केल्या व हैद्राबादसमोर 211 धावांचं लक्ष्य ठेवलं. फलंदाजी करताना राजस्थानच्या जोस बटलरने 28 चेंडूत 35 धावा केल्या तर, यशस्वी जयसवालने 16 चेंडूत 20 धावांची मजल मारत मग विकेट टाकली. यानंतर फलंदाजीकरीता आलेला कर्णधार संजू सॅमसनने मात्र तग धरून ठेवला व चांगलीच फटकेबाजी देखील केली. सॅमसनने 27 चेंडूत 55 धावांची अतिशय यशस्वी फलंदाजी केली. त्याला सात दिली ती युवा फलंदाज देवदत्त पडिकळ याने. पडिकळने 29 चेंडूत 41 धावा ठोकल्या. ह्यानंतर, शिमरन हेटमायर व रियान पराग या दोघांनी संघाची धूरा सांभाळली. हेटमायरने 13 चेंडूत 32 तर, पराग याने 9 चेंडूत 12 धावा केल्या.