Mumbai

दबावापुढे शासनाची माघार: होळी आता धुमधडाक्यात

Published by : Jitendra Zavar

कोरोना व्हायरसचं (coronavirus) प्रमाण कमी झाल्यानं राज्यातील अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर 17 आणि 18 तारखेला होळी, धुलिवंदनचा सण साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात शासनाने निर्बंध जारी केले होते. मात्र या निर्बंधांना झालेल्या विरोधानंतर शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे. यामुळे धुमधडाक्यात होळी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना व नवी नियमावली

होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत (holi )गृह विभागाने मार्गदर्शक (home department maharashtra)सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. १७ मार्च, २०२२ रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच दि. १८ मार्च रोजी धूलिवंदन व २२ मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

होळी / शिमगा सणानिमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने दि. १ मार्च, रोजी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

यापुर्वी काय होते निर्बंध

रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक
होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी.
दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई
होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई
होळी खेळताना महिला तसेच मुलींनी खबरदारी घेण्याचे आवाहन.
कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

IPL Mega Auction 2025 Live: केएल राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत