India

हिंदू कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करणार- मुख्यमंत्री बोम्मई

Published by : left

नंदकिशोर गावडे | कर्नाटकात हिजाब प्रकरण तापले असताना रविवारी बजरंग दलाच्या 26 वर्षीय कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कर्नाटक राज्यातले वातावरण तापले आहे. या प्रकरणावर आता हिंदू कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करू असे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे.बंगळुर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.

कर्नाटकातील शिमोगामध्ये (Shivamogga) रविवारी रात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या (Bajrang Dal activist Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय कार्यकर्त्याचे नाव आहे. चाकूने सपासप वार करुन हर्षावर हल्ला करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे सध्या शिमोगामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिजाब विरोधी पोस्ट (Hijab) केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

कर्नाटकात हिजाबवरुन वाद सुरु झाल्यापासून बजरंग दलाने सक्रिय भूमिका बजावली आहे. अशा स्थितीत या हत्येनंतर उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. काही जण या हत्येला हिजाबच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. या हल्ल्याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

हिंदू कार्यकर्ता हर्षा यांच्या खुणाचे घागेदोरे पोलिसांना सापडले असून आरोपीना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली आहे. तसेच आरोपींना कठोर कारवाई केली जाईल मात्र नागरिकांनी शांतता पाळावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव