International

Heat Dome | कॅनडाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तापमान 50 अंश सेल्सिअस

Published by : Lokshahi News

कॅनडा देश तिथल्या थंडीच्या हंगामासाठी, पण सध्या ते चर्चेत आहे उष्णतेच्या भयंकर लाटेसाठी. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे अवघ्या काही दिवसांत तिथे शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडाच्या स्थानिक प्रशासकीय कार्यालयांमधले फोन मदतीच्या मागणीसाठी सारखे खणखणत आहेत. कारण तिथल्या तापमानाचा पारा तब्बल 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आणखीही अनेकांचे प्राण उष्णतेच्या लाटेमुळे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कॅनडातल्या (Canada) ब्रिटिश कोलंबियामधल्या लिटन या गावात गेल्या मंगळवारी (29 जून) तब्बल 49.6 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं. त्यामुळे अनेक जंगलांमध्ये आगीही लागल्या. या आगींमुळे गावाचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे. गेल्या आठवड्यात तिथलं तापमान इतकं वाढू लागलं आहे, की तिथल्या नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. वास्तविक तिथलं तापमान थंड असल्यामुळे बहुतांश घरांमध्ये एअर कंडिशनरची (Air Conditioners)आवश्यकता भासत नाही. आताच्या परिस्थितीत मात्र एसी नसलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचे उष्णतेमुळे हाल होत आहेत.

अत्यंत कडक उन्हाळ्यापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कॅनडा सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे. तिथल्या स्टेडियम्समध्ये एअर कंडिशनर लावून कूलिंगची व्यवस्था करण्यात आली. ही स्टेडियम्स लोकांसाठी खुली करून देण्यात आली आहेत. तिथे येऊन लोक काम करू शकतात किंवा अगदी झोपूही शकतात. थोडक्यात सांगायचं झालं, तर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी एखादी छावणी उभारावी, तसंच हे आहे.

अनेक मोठ्या शहरांमध्ये मिस्टिंग स्टेशन्स तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी थंड पाण्याचे फवारे सातत्याने उडवले जात असतात. त्यामुळे निदान थोड्या वेळासाठी तरी उष्णतेपासून सुटका होते आणि थोडा दिलासा मिळतो. ही उष्णतेची लाट इतकी भयंकर आहे, की अशा मिस्टिंग स्टेशन्सवर लोक कोरोना संसर्गाची भीती सोडून एकत्र होत आहेत, गर्दी करत आहेत.

हीट डोम म्हणजे काय ?
महासागरांचं (Oceans) तापमान वाढतं, त्या वेळी 'हीट डोम'ची स्थिती उद्भवते. या प्रक्रियेला संवहन म्हणतात. त्यात गरम हवा वर जात असताना समुद्राच्या तळापासून वरपर्यंतच्या पाण्याला गरम करत जाते. वरच्या दिशेला जाताना गरम हवा एक वर्तुळ तयार करते आणि पुढे जाते. यालाच हीट डोम असं म्हणतात.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय