आरोग्य मंत्रा

हिवाळ्यात हे पदार्थ खराब कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात, लक्षात ठेवा 'या' गोष्टी...

खाण्यापिण्याचे विकार आणि खराब जीवनशैलीमुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हिवाळ्यात कोलेस्टेरॉलची समस्या टाळण्यासाठी काही पदार्थांपासून अंतर ठेवावे. चला जाणून घेऊया याबद्दल...

Published by : Team Lokshahi

थंडीचा हंगाम सुरू होताच आजारांचा धोकाही वाढतो. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते, त्यांना सर्दी, ताप, खोकला यांसारख्या व्हायरल इन्फेक्शनचा संसर्ग होतो. त्याचबरोबर जे लोक कोलेस्टेरॉलच्या समस्येशी झगडत आहेत, त्यांनी हिवाळ्यात स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत - गुड (HDL) आणि बॅड (LDL). निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरात गुड कोलेस्टेरॉल असणंही गरजेचं आहे.

परंतु शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषत: या अवस्थेत हृदयाला सर्वाधिक धोका असतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगतो ज्यापासून अंतर ठेवून तुम्ही बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या टाळू शकता.

गोड गोष्टींपासून दूर राहा

जर तुम्हाला जास्त मिठाई खाण्याची आवड असेल तर तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या होऊ शकते. हिवाळ्यात लोकांना गाजराचा हलवा किंवा तिळाचे लाडू खायला आवडतात. पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवते. साखरेमुळे शरीरातील ट्रायग्लिसेराइडची पातळी वाढते. त्यामुळे ते टाळले पाहिजे.

फास्ट फूड

फास्ट फूडची क्रेझ शहरातून गावातील लोकांनाही दिसून येत आहे. पण जेवण जेवढं चविष्ट दिसतं तेवढंच आरोग्यासाठीही धोकादायक असतं. फास्ट फूडमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, जे हृदयासाठी खूप धोकादा

सिगारेट आणि अल्कोहोल

हिवाळ्यात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अल्कोहोल आणि सिगारेटसारख्या सवयीही टाळायला हव्यात. ते आपले आरोग्य बिघडवतात आणि कोलेस्ट्रॉल वाढविण्याचे काम देखील करतात.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड