आरोग्य मंत्रा

दिवाळीत तेलाचा दिवा का लावला जातो? आयुर्वेदाने सांगितलं मोठं गुपित

दिव्यांची आवली ज्यात असते ती दीपावली. सध्या दीप या शब्दाचा अर्थ दिवा असा घेतला जात असला, तरी दीपावलीतला दीप हा तेलाचा दिवा या अर्थानी आलेला आहे.

Published by : shweta walge

भारतीयांचा सर्वात मोठा आणि धामधुमीनी साजरा होणारा सण म्हणजे दीपावली. बोली भाषेत जरी आपण दिवाळी असं म्हणत असलो, तरी खरं म्हणजे दीपावली असं म्हणायला हवं. दिव्यांची आवली ज्यात असते ती दीपावली. सध्या दीप या शब्दाचा अर्थ दिवा असा घेतला जात असला, तरी दीपावलीतला दीप हा तेलाचा दिवा या अर्थानी आलेला आहे. मात्र electricity वर चालणारा दिवा आणि मातीच्या पणतीत किंवा समईत तेल आणि वातीच्या मदतीनी पेटवलेला दिवा यांच्यात खूप फरक असतो.

आयुर्वेदात तिळाच्या तेलाचा दिवा हा आसपासचं वातावरण शुद्ध करणारा असतो असं सांगितलेलं आहे. म्हणूनच शस्त्रकर्मानंतर जोपर्यंतcut घेतलेल्या ठिकाणची जखम पूर्णपणे भरून येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या खोलीत 24 hour तेलाचा दिवा तेवत ठेवण्याचा उल्लेख आयुर्वेदात सापडतो. तसंच बाळाच्या जन्मानंतर, बाळ बाळंतीण ज्या खोलीत राहतात, त्या ठिकाणी सुद्धा अखंड दिवा तेवत ठेवायला सांगितलेला आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये. पावसाळ्यातला दमटपणा आणि शरद ऋतुमुळे वातावरणात वाढलेली उष्णता या दोन्ही गोष्टी जंतुसंसर्गाला पोषक असतात आणि म्हणूनच पावसाळ्यानंतर येणाऱ्या दीपावलीत घराघरात असे तेलाचे दिवे लावण्यामागे संपूर्ण आसमंत शुद्ध होण्याची योजना असते.

असंही मंदिर असो, चर्च असो, किंवा सुफी लोकांचं प्रार्थनास्थळ असो, या प्रत्येक ठिकाणी तेलाचे, तुपाचे दिवे किंवा bee wax candle लावण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे ती यामुळेच. त्यामुळे सध्या जरी electric माळा लावण्याचा trend वाढत चाललेला असला, या माळा लावणं सोपं असलं, घराची शोभा वाढवण्यास मदत करणाऱ्या असल्या तरी त्या बरोबरीनी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याची आपली संस्कृती सुद्धा आपण सर्वांनी जपायला हवी.

मंडळी, दीपावलीची तयारी करताना पणत्यांना विसरू नका किंवा तिच्या ऐवजी paraffin wax ची T candle वापरू नका.रोशणाईची माळ लावली तरी दाराबाहेर, अंगणात किंवा बाल्कनीत पणत्यांची ओळ सुद्धा नक्की लावा यामुळे दीपावली साजरी करण्यामागचा खरा उद्देश सांध्य होईल आणि सर्वांचं आरोग्य सुरक्षित राहील. सण उत्सवांच्या निमित्तानी आपण पाळत असलेल्या प्रथा परंपरांमागचा अर्थ जाणण्यासाठी पहात रहा.

Congress Candidate List 2024: काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Delhi Mahayuti Meeting | दिल्लीतील चर्चा पूर्ण, उद्या मुंबईत अंतिम चर्चेची शक्यता | Marathi News

निवडणुकीच्या धामधुमीत गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Congress Candidate List 2024 : कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 48 उमेदवारांची घोषणा; पाहा कुणाला कुठून संधी?

"महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत येणार", मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य