आरोग्य मंत्रा

तुळशी विवाहानंतरच लग्नाचे मुहूर्त का? जाणून घ्या कारण

तुळशीच्या लग्नानंतरच लग्नाचे मुहूर्त का असतात? जाणून घ्या भारतीय संस्कृतीतील या प्रथेमागचं आरोग्य शास्त्र आणि महत्व.

Published by : shweta walge

शास्त्राचा, भारतीय संस्कृतीतील प्रथा परंपरांमागची आरोग्य संकल्पना जाणून घेण्याचा. दीपावली नंतर येणारा पहिला सण म्हणजे तुलसी विवाह. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून तेत्रिपुरारीपौर्णिमेपर्यंत घराघरात तुळशी आणि श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री प्रतिष्ठेला खूप महत्त्व दिलेलं आहे. रामायणातलं सीता स्वयंवर असो किंवा महाभारतातला द्रौपदीचामत्स्यवेध असो, आपला जोडीदार ठरवण्याच स्वातंत्र्य हे स्त्रीला दिलेलं दिसतं. तुलसी विवाहातही तुळशीचा विवाह साक्षात श्रीकृष्णांशी होत असला तरी त्याला श्रीकृष्णविवाह म्हणत नाहीत. यातूनही लग्न स्त्रीच्या इच्छेनुसार होणं अपेक्षित आहे हे समजतं.

भारतीय परंपरेत तुळशी विवाहाशी अजून एक गोष्ट जोडलेली आहे व ती म्हणजे एकदा तुळशीचं लग्न झालं की लग्नाचे मुहूर्त सुरू होतात आणि चातुर्मासात बंद असलेला लग्नाचा season पुन्हा सुरू होतो. आरोग्य शास्त्राच्या दृष्टीनी ही प्रथा अतिशय समर्पक आहे. वर्षा ऋतू संपला त्यानंतरचा शरद ऋतू संपत आला आणि हेमंत ऋतुचे वेध लागले की त्या बरोबरीनी विवाहाचे मुहूर्त सुरू होतात कारण वर्षा ऋतूत शरीर शक्ती कमी झालेली असते, वातदोषाचा प्रकोप झालेला असतो, शरद ऋतूतपित्तदोष वाढलेला असतो त्यामुळे तेव्हा सुद्धा शरीरशक्ती साधारणच असते.

मात्र दीपावलीत केलेल्या दीपोत्सवानंतर अग्नीचं बल जसजसंवाढतं तसतशी शरीरशक्तीत सुधारणा होते आणि त्यामुळे हा काळ स्त्री पुरुषाच्या मिलनासाठी आदर्श ठरतो. गर्भसंस्कारामध्येही उत्तम अपत्य प्राप्तीसाठी हेमंत ऋतू सुचवलेला आहे. त्यामुळे फक्त physical attraction मधून अपत्य जन्माला येण्याऐवजी, समाजाची उन्नती करणारं, देशाच्या प्रगतीला कारण ठरणारं, संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शक ठरणारं अपत्य जन्माला यावं यासाठी आपल्याकडे तुलसी विवाहा नंतर लग्न करण्याची प्रथा आखून दिलेली दिसते.

संपूर्ण वनस्पती जगताची राणी म्हणजे तुळशी असं म्हणायला हरकत नाही. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचा गुणधर्म असतो शिवाय प्राणशक्ती अधिकाधिक आकर्षित करण्याचीही शक्तीअसते. म्हणूनच तर शक्तीचा परमोच्चस्रोत असणाऱ्या श्रीकृष्णांशी तिचा विवाह होऊ शकतो, तो सुद्धा एकदाच नाही तरदरवर्षी आणि प्रत्येक घरात.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान