आरोग्य मंत्रा

Shravan: श्रावण सोमवार या दिवशी उपवासाला कोणते पदार्थ खावेत? जाणून घेऊया...

उपवासामुळे शरीराची पचनक्रिया अधिक चांगली होते आणि चयापचय गती वाढते.

Published by : Team Lokshahi

उपवास करणं केवळ धार्मिकदृष्याच नव्हे तर शरीरासाठीही चांगले मानले जाते. उपवासामुळे शरीराची पचनक्रिया अधिक चांगली होते आणि चयापचय गती वाढते. मात्र, या काळात काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. श्रावण महिन्यात भगवान शंकराचा दिवस मानल्या जाणाऱ्या सोमवारचे व्रत आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. उपवासाला चालणारे त्याचबरोबर उर्जा प्रदान करणारे कोणते पदार्थ आहेत समजून घेऊया.

1.फळ

श्रावणात अनेकजण उपवास करत असल्याने फलाहार महत्नाचा ठरतो. याासाठी योग्य फळ खाणे आवश्यक आहे. त्यातही मुबलक पोटॅशियम, व्हिटीमीन सी असलेली फळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे या महिन्यात बाजारात उपलब्ध असलेली फळे खावीत. या फळांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

2. दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही , पनीर, लस्सी, ताक. चीज या पदार्थांचे आवर्जून सेवन करावे.

3.मखाने

फराळ म्हणून दिवसातून चार वेळा खाता येईल, अशी एखादी वस्तू हवी असेल तर मखाना सर्वोत्तम ठरेल. हा एक अतिशय हलका नाश्ता आहे आणि संशोधनानुसार ते रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करू शकते.

4. ड्राय फ्रुट्स

जर तुम्हाला माखाना हा हलका नाश्ता वाटत असेल तर ड्रायफ्रुट्स खाणे हा उत्तम पर्याय असू शकतो. ड्राय फ्रुट्सना सुपर फूड म्हटले जाते ज्यात पौष्टिक मूल्य देखील जास्त असते आणि त्याच वेळी ऊर्जा मिळते. ड्राय फ्रुट्स जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने इत्यादींनी समृद्ध असतात, ज्यामुळे ते एक परिपूर्ण आहारात समाविष्ट होतात.

5. साबुदाणा

या दिवसात साबुदाण्याची खिचडी व वडे घराघरात बनवले जातात. साबुदाणा पापड, खीरीला लोकांची पसंती असते. उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाणे हा उत्तम पर्याय असू शकतो. \

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण