ताप म्हटलं की आपल्याला माहित असलेले तापासंबंधी रोग म्हणेज डेंग्यूची, सर्दी-खोकला, टायफॉइड आणि मलेरिया यांच्या विषयी आपल्याला माहित आहे. पण तापाचा आणखी एक प्रकार पडतो म्हणजे 'व्हॅली फिव्हर' या बद्दल काही लोकांनाच माहित असेल 'व्हॅली फिव्हर' ज्याला 'व्हायरल फिव्हर' असे देखील म्हटले जाते हे नेमक काय आहे? 'व्हॅली फिव्हर' हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. व्हॅली फिव्हर हा आजार धुळीत मोठ्या प्रमाणात वाढतो. व्हॅली फिव्हरचे जंतू श्वासाद्वारे किंवा एखाद्या खराब झालेल्या बीजाणूंमध्ये श्वास घेतल्याने शरीरात प्रवेश करतात आणि रक्तात मिसळून शरीरात पसरतात. हा आजार माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये देखील आढळतो. यानंतर एका ठराविक काळानंतर याची लक्षणे जाणवू लागतात.
'व्हॅली फिव्हर' ची लक्षणे:
'व्हॅली फिव्हर' हा आजार एखाद्या संसर्गजन्य व्यक्तीपासून देखील होऊ शकतो. अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला 'व्हॅली फिव्हर' झाला असेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहणं. 'व्हॅली फिव्हर' झाल्यास शरीरावर पुरळ येतात हे पुरळ ठिपकेदार असू शकतात आणि शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. तसेच रात्रीच्या वेळेस आणि अधून-मधून घाम येऊ शकतो, तसेच थंडी देखील जाणवू शकते. शरीराला थंडी आणि गरम दोन्ही एकत्र जाणवल्यामुळे डोकेदुखी, सर्दी-खोकला आणि ताप या गोष्टी जाणवू शकतात. तसेच शरीरातील अवयवांमध्ये अचानक त्रास जाणवू शकतो. यामध्ये सांधेदुखी, पाय दुखणे, स्नायू दुखणे आणि शरीरात इतर ठिकाणी दुखणं जाणवू शकतं. ज्या वेळेस असं काही जाणवू लागेल त्यावेळेस त्वरित ओळखीच्या डॉक्टरांकडे उपचार करून घ्यावा.