निरोगी राहण्यासाठी भाज्यांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. विशेषतः हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात. भेंडी यापैकी एक आहे. ज्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि कार्ब्स आढळतात.
जर एखाद्याला ऍलर्जी असेल तर त्यांनी भेंडीचे सेवन करू नये. यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे भेंडी खाणं टाळलेलं चांगले.
भेंडीमध्ये फायबर खूप चांगल्या प्रमाणात आढळते आणि त्यामुळे त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. पण जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही भेंडीचे सेवन करताना त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी.
किडनीशी संबंधित आजारांमध्ये भेंडी खाऊ नये. विशेषत: जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल किंवा तुम्हाला ही समस्या आधीही झाली असेल तर भेंडीचे सेवन अजिबात करू नका.
येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.