Winter 2023: हिवाळ्याच्या हंगामात मुलांना अनेकदा त्रास देणारी एक गोष्ट म्हणजे छातीत कफ साचण्याची समस्या. बऱ्याचदा पालकांना असे वाटते की छातीत थोडासाच कफ जमा झाला आहे, परंतु कालांतराने तो गंभीर रोगात बदलतो. अशा परिस्थितीत वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, त्याची लक्षणे ओळखा जेणेकरुन त्यास वेळीच प्रतिबंध करता येईल.
कफाचा रंग सांगतो की संसर्ग किती खोलवर आहे?
डॉक्टरांच्या मते, हिवाळ्याच्या काळात मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये कफ जमा होण्याची समस्या उद्भवते. यासोबतच मुलांमध्ये खोकला, ताप आणि डोकेदुखीच्या वेळी तोंडातून कफ किंवा श्लेष्मा बाहेर पडणे. घशात वेदना किंवा जळजळ होणे. मुलाच्या छातीत जमा झालेला कफ लवकरात लवकर काढून टाकावा. खोकल्यामुळे गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो. बाहेर येणारा कफ पिवळा किंवा लाल असेल तर ते गंभीर संसर्गाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर कफाचा रंग पांढरा असेल तर घाबरण्याची गरज नाही. औषधाने किंवा घरगुती उपचारांनी तो बरा होऊ शकतो.
या घरगुती उपायाचा करा अवलंब
जर तुम्हाला तुमच्या मुलाचा कफ घरगुती उपायांनी काढून टाकायचा असेल तर त्याच्या छातीला मोहरीच्या तेलाने मालिश करा. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने कफ सहज निघून जातो. तुम्ही मोहरीच्या तेलात लसूण देखील वापरू शकता. तेल घ्या, त्यात लसणाची छोटी पाकळी टाका, नंतर तेल गरम झाल्यानंतर छातीवर चोळा. यामुळे कफ सहज निघून जातो. कफ बाहेर काढण्याचे अनेक मार्ग आहेत. ते म्हणजे सकाळी दूध हलके गरम करून त्यात हळद टाकून पिणे. हळद गरम असते आणि शरीरातील कफ काढून टाकण्यास देखील मदत करते.