आरोग्य मंत्रा

केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या...

केसातील कोंडा कायमचा कमी करण्यासाठी हे सोपे आणि घरगुती उपाय

Published by : Team Lokshahi

प्रत्येकाला वाटतं की आपले केस काळेभोर, रेशमी, मुलायम दाट लखलखीत असावेत. केस निरोगी असतील तर केसांची कोणतीही फॅशन आणि हेअरकट करता येतो. केसांमुळे आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो.आज प्रत्येकजण केसांच्या समस्यांमुळे कंटाळून गेला आहे. केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. बॅक्टेरियामुळे आपल्या टाळूचा वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा तयार होतो जो नंतर दाट पांढरा थर म्हणून टाळूवर बसलेला दिसतो. कोंडा हा केसांची नीट निगा, स्वच्छता न ठेवल्यास आणि त्वचारोगाच्या समस्यांमुळे देखील होऊ शकतो.

केसातील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

1. तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाजनंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या सुटेल.

2. आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करावी. एक चमचा लिंबाचा रस 5 चमचे नारळाच्या तेलात टाकून केसांना हळूवार बोटांनी मालीश करा कोंडा काही दिवसांत निघून जाईल.

3. लिंबू हे व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सीडेंटचा स्रोत आहे. लिंबू आपले केस दाट आणि चमकदार बनवू शकते

4. रात्रभर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. त्यांना सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ते केसांत लावा आणि 30 मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा. केसांतला कोंडा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे.

5. एक चमचा दही केसांना लावा आणि एक तास ठेवा आणि मग डोके धुवा.

6. कोरफड गर लावा कोंडा घालवा. एलोवेरा जेल किंवा कोरफड गराने मालिश केल्याने केसांच्या आणि डोक्याच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

7. डोक्याच्या त्वचेला पाणी न लावता कडुलिंबाची पाने चोळा आणि थोड्या वेळाने डोके धुवा.

8.केसांत कोंडा होत असेल तर तुळस आणि आवळा पावडर एकत्र करून अर्धा तास डोक्याच्या त्वचेवर लावा. यानंतर हर्बल शैम्पूने धुवा.

IPL Mega Auction 2025 Live: केएल राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत