Bathing in Fever : पावसाळ्यात अनेक आजार झपाट्याने वाढू लागतात. यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि डोळे येणे हे सर्व आजार आपले हातपाय पसरू लागतात. पावसाळ्यात तापाची साथच येते. ताप आल्यावर लोक आंघोळ करणे टाळतात. कारण आंघोळ केल्याने ताप आणखी वाढेल असा अनेक जणांचा विश्वास आहे. आता प्रश्न पडतो की ताप आल्यावर आंघोळ करावी की नाही? चला जाणून घेऊया...
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ताप आल्यावर जर तुम्ही आंघोळ केली तर त्याचा शरीरावर किंवा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. ताप असताना शरीरात खूप वेदना होतात आणि अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळेच या काळात बहुतेकांना आंघोळ करावीशी वाटत नाही. तापातही आंघोळ केल्याशिवाय राहता येत नसेल तर आंघोळ करता येते. मात्र, थंड पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. कारण कोमट पाण्याने अंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि शरीराचे वाढलेले तापमानही कमी होऊ शकते.
थंड पाण्याने अंघोळ करू नका
खूप ताप असेल तर चुकूनही थंड पाण्याने अंघोळ करू नका. कारण असे केल्याने तुमच्या अडचणी वाढू शकतात. काही लोक, ज्यांना रोज आंघोळ करण्याची सवय असते, ते तापातही आंघोळ करतात. मात्र, काहीवेळा तापामुळे शरीर इतके अशक्त होते आणि इतके दुखू लागते की काय करावे तेच समजत नाही.
आपण आंघोळ करू शकत नसल्यास काय करावे?
अशा स्थितीत टॉवेल थंड पाण्यात भिजवा. त्यानंतर या टॉवेलने तुमचे शरीर पुसून टाका. यामुळे तुमची आंघोळ न करण्याची समस्याही दूर होईल आणि तुम्हाला तापातही आराम मिळेल.