आरोग्य मंत्रा

झेंडूचं फुल: आरोग्यासाठी फायदेशीर आणि लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक; जाणून घ्या

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूचं फुल वापरण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. झेंडूच्या फुलांमुळे किडे, किटक आणि इन्फेक्शनपासून संरक्षण मिळतं. पाइल्ससाठी झेंडूच्या फुलांचा रस उपयुक्त ठरतो.

Published by : shweta walge

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोप

आज आहे लक्ष्मीपूजन. जीवन यथार्थ पद्धतीने जगण्यासाठी जे काही आवश्यक असतं, ते सगळं देणाऱ्या लक्ष्मी मातेच्या पूजनाचा आजचा दिवस. संपत्तीला प्रतिनिधित्व करणारं ते धन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातलं सोनं, नाणं, दाग दागिने, पैसे यांची आपण पूजा करतो आणि ही पूजा करताना अगदी हमखास वापरलं जाणार फुल म्हणजे झेंडूचं फुल. झेंडूच्या फुलांचा रंगच इतका छान केशरी असतो की ते नुसतं बघितलं तरी मनात उत्साह जाणवल्याशिवाय राहत नाही. झेंडूचं झाड हे किडे, किटक आणि इन्फेक्शनला दूर ठेवणारे असतात, म्हणूनच अनेक शेतकरी शेताच्या बांधावर, विशेषतः भाज्या वगैरे लावलेल्या असतील तर त्याच्या कडेला झेंडू आवर्जून लावतात. याशिवाय औषधातही झेंडू वापरला जातो.

Piles मुळे bleeding होत असेल तर त्यावर झेंडूची फुलं वापरता येतात. झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात, थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घ्याव, नंतर सुती कापडातून गाळून रस काढावा. दोन चमचे रसात, दोन चमचे तूप मिसळून घ्यावा, सकाळ संध्याकाळ हा उपाय केल्यानी साधारण दोन-तीन दिवसात रक्त पडण्याचा थांबतो.

मॉडर्न रिसर्चमध्ये सुद्धा झेंडूची फुलं antimicrobial, anti inflammatory,antibacterial, insecticide म्हणून काम करतात असं दिसून आलं आहे. जखम शुद्ध करण्यासाठी आणि ती नीट भरून येण्यासाठी मदत करणारी असतात असही सिद्ध झालेलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या आजच्या या दिवशी झेंडूची फूलं वाहून लक्ष्मीची पूजा करू या आणि तीच्या आर्शिवादानी सुख समृद्धीनी परिपूर्ण जीवन जगु या.

सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Harshvardhan Patil : मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल

Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?

Shaina NC : उबाठा मला माल बोलता... "तुम्ही बेहाल होणार .."| Mumba Devi VidhanSabha

Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकर चौथ्यांदा गड राखणार?