Rain Bath : राज्यात पावसाची सुरुवात झाली असून नागरिक सुखावले आहेत. अशात, काही लोक पर्यटन स्थळी अथवा घरीच पावसाचा आनंद लुटतानाही दिसत आहेत. प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी पावसात आंघोळीचा आनंद घेतला असेलच. काही लोक पावसात आंघोळीला अनेक आजारांशी जोडतात. तर काही लोक पावसात आंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. पावसामुळे काही लोकांना सर्दी आणि ताप येऊ शकतो. मात्र, याशिवाय शरीरावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. परंतु, पावसात आंघोळ केल्याने अनेक समस्या दुर होतात. आश्चर्यचकीत झाला ना. आम्ही तुम्हाला आज पावसात आंघोळ केल्याने शरीराच्या कोणत्या समस्या दूर होतात हे सांगणार आहोत.
पावसात आंघोळीचे फायदे
1. पावसाच्या पाण्यात अनेक खनिजे आढळतात, जी मानवांसाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये अल्कलाइन पीएफ असते, जे केस मजबूत करण्याचे काम करते. त्यात जड धातूही नसतात. त्यामुळे केसांचा निस्तेजपणाही दूर होतो.
2. पाऊस केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामुळे त्वचेची आर्द्रता कायम राहते आणि शरीरावर चिकटलेली घाण सहज निघते.
3. पावसात आंघोळ करताना शरीरात सेरोटोनिन आणि एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात. हे हार्मोन्स तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आणि तुम्हाला आनंदी बनवण्याचे काम करतात.
4. याशिवाय मन आणि शरीरालाही खूप आराम वाटतो. जर तुम्हाला हार्मोनल असंतुलनाची समस्या असेल तर पावसात आंघोळ करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
या गोष्टींची काळजी घ्या
1. मोसमातील पहिल्या किंवा दुसऱ्या पावसात आंघोळ करणे टाळावे. कारण ते खूप प्रदूषित आहे. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
2. पावसात जास्त वेळ अंघोळ करण्याची चूक करू नका. कारण त्यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो.