आरोग्य मंत्रा

October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये स्वतःची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या...

Published by : Dhanshree Shintre

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

ऑक्टोबर महिना सुरू झाला की ऑक्टोबर हिट जाणवल्याशिवाय राहत नाही. आयुर्वेदातही पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधल्या दिवसात म्हणजे शरद ऋतूतपित्तदोषाचा प्रकोप होतो असं सांगितलेलं असतं. शरीरात पित्त वाढलं की हाता-पायांची जळजळ होणं, डोकं दुखणं, तोंड येणं, अंगावर रॅशेस येणं, डोळे लाल होणं, केस गळणं असे अनेक त्रास होऊ शकतात. या सगळ्या तक्रारींवर उपयोगी आणि घरच्या घरी आपल्या सर्वांना सहज करता येणारी रेमेडी म्हणजे पादाभ्यंग.

यासाठी लागतात फक्त दोन गोष्टी. एक म्हणजे शुद्धकाशाची वाटी आणि दुसरं म्हणजे शतधौत घृत अर्थात शंभर वेळा पाण्याने धुतलेलं तूप. पण जर असं तूप उपलब्ध झालं नाही, तर घरी बनवलेलं साजूक तूप वापरलं तरी चालतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पादाभ्यंग करणं इतकं सोपं असतं की ते आपण स्वतः स्वतःलाही करू शकतो.

कसं करायचं पादाभ्यंग?

सर्वप्रथम संपूर्ण तळपायाला तूप लावायचं. हातात काशाची वाटी घ्यायची आणि वाटीच्या मदतीने अधून-मधून गोलाकार आणि टाच ते पायांच्या बोटापर्यंत वर खाली अशा पद्धतीनी संपूर्ण तळपाय छान चोळायचा. शरीरात उष्णता वाढलेली असेल तर पादाभ्यंग करताना बघता बघता तळपाय काळा होतो. कधी कधीब्लॉक्ड उष्णता असेल तर अगदी पहिल्या सेशनमध्ये पाय काळे झाले नाहीत तरी तीन-चार सेशन्सनंतर सुरुवातीला ग्रे आणि नंतर काळा रंग दिसू लागतो.

यामुळे मुख्य म्हणजे उष्णता कमी होत असल्याने ताप आला असता पादाभ्यंगकरण्याने खूप बरं वाटतं. डोकं दुखत असेल, डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास असेल, ब्लडप्रेशर वाढलं असेल, खूप मानसिक ताण आला असेल तर पादाभ्यंगसारखा दुसरा प्रभावी आणि सोपा उपचार शोधूनही सापडणार नाही. मग? सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे. ऑक्टोबर हिटची धग लागू द्यायची नसेल तर घरी पादाभ्यंगकरण्याची सवय लावून घ्या आणि निरोगी राहा.

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 ची पहिली फायनलिस्ट ठरली! ग्रँड फिनालेमध्ये केली निक्कीने पहिली एंट्री

Shivneri Sundari : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

Nitesh Rane ; 'इम्तियाझ जलील यांना अटक करा' शंभुभक्तांच्या मागणीला नितेश राणेंचा पाठिंबा

Navratri 2024: नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण का केले जाते? जाणून घ्या...

Navratri 2024: नवरात्रोत्सवनिमित्त 'सती' या देवीची जाणून घ्या महत्त्वपूर्ण कथा