Home Remedies For Mosquito Bite : पाऊस सुरु झाल्यानंतर डासांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत जाते. हवामानातील आर्द्रता आणि पावसामुळे डासांना वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते. डास चावल्यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठते आणि जळजळ होते. कधी कधी इतकी खाज सुटते की राग यायला लागतो. डासांपासून दूर राहण्यासाठी लोक मच्छरदाणी आणि मच्छरनाशक क्रीम लावतात. पण, घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही डास चावल्यामुळे होणाऱ्या त्रासासून तुम्ही सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
बर्फ
बर्फाच्या थंडपणामुळे सूज कमी होण्यास मदत होते. डास चावल्यामुळे कधीकधी त्वचेवर जळजळ होते, परंतु बर्फ लावल्याने त्वचा बधीर होते आणि काही काळ जळजळ कमी होते. जर तुम्हाला बर्फ थेट लावायचा नसेल तर तुम्ही बर्फ कापडात गुंडाळून प्रभावित त्वचेवर लावू शकता. मात्र, त्वचेवर बर्फ जास्त काळ ठेवू नका.
कोरफड
कोरफड तुमच्या त्वचेसाठी अद्भुत काम करते. हे डास चावल्यामुळे होणारी सुटणारी खाज दूर करण्यास मदत करू शकते. कोरफड जेलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे डासांच्या चाव्यावर औषध म्हणून काम करतात. यासाठी तुम्ही कोरफडीचे ताजे जेल काढू शकता आणि ते प्रभावित त्वचेवर लावू शकता.
कांदा
कांदा बहुतेक प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असतो. अनेक खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. डास चावल्यावरही तुम्ही कांदा वापरू शकता. डास चावल्यामुळे सूज किंवा लालसरपणा असलेल्या ठिकाणी तुम्ही ताज्या कांद्याचा तुकडा लावू शकता आणि थोड्या वेळाने पाण्याने धुवा. यामुळे सूज बर्याच प्रमाणात बरी होईल.
पाणी
पाणी सर्वांवरच औषध आहे. डास चावल्यानंतर तुम्ही पाणी प्रभावित त्वचेवर लावल्यास सुटणारी खाज थांबेल. तसेच, जळजळही कमी होण्यास मदत होईल.