आरोग्य मंत्रा

Home Remedies for Corn : फुट कॉर्न्स म्हणजे काय? 'असा' करा उपाय!

फुट कॉर्न्सची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय! गव्हाचं पीठ, गोडं तेल, हळद आणि मीठ यांचा वापर करून तळपायांवरील कॉर्न्सवर करा उपचार. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Published by : shweta walge

हातापायाच्या तळव्यांना कॉर्न्स म्हणजेच कुरूप असण्याची समस्या अनेकांना असते. चुकीच्या चपला किंवा बूट घातल्यानी, तळव्यांवर सतत दाब पडल्यानी, एकाच बिंदूवर सातत्यानी घर्षण झाल्यानी कुरूप वाढ होतं असं दिसून येतं. कुरूप असतं, त्या ठिकाणची त्वचा कडक झालेली असते आणि दबाव आलं की त्या ठिकाणी दुखतं. त्यामुळे तळपायांवरती फुट कॉर्न्स असलं की उभं राहणं, चालणं हे खूप वेदनादायक ठरू शकतं.

पण मंडळी, आता फुट कॉर्न्सची भीती बाळगायची गरज नाही. या साध्या उपचारानी फुट कॉर्न्सला आपण घरच्या घरी उपचार करू शकतो. यासाठी लागतात स्वयंपाकघरमधल्या चार गोष्टी.

गव्हाचं तीन ते चार चमचे पीठ, अर्धा चमचा गोडं तेल, पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ सर्वप्रथम या चारही गोष्टी एकत्र कराव्यात. मग यात आवश्यक तितकं पाणी घालून त्याची लांब गोलाकार वर्ती तयार करावी.

तवा तापायला ठेवावा. तो नीट तापला की वर्तीचं एक टोक हातात धरून दुसरं टोक तव्यावर ठेवून गरम करावं. आणि ज्या ठिकाणी corn असेल त्या ठिकाणी गरम लागेल पण भाजणार नाही इतक्या वेळेसाठी शेकावे.

फुट कॉर्न्सवर असणाऱ्या मृत त्वचेमुळे सहसा लगेचच चटका लागत नाही, त्यामुळे एक मिनिटानी पुन्हा वर्तीचं टोक गरम करून पुन्हा फुट कॉर्न्सवर शेक घ्यावी.

साधारण सात ते आठ वेळा किंवा उष्णता सहन होईनाशी होण्यापर्यंत ही क्रिया करावी. अशा प्रकारे एक दिवस आड हा उपचार केल्यामुळे साधारण एका आठवड्यात फुट कॉर्न्समुळे होणाऱ्या वेदना, त्या ठिकाणचा कडकपणा कमी होताना दिसतो. याच्या बरोबरीने रोज रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करण्याचा अजून चांगला आणि पटकन गुण येतो. त्यामुळे मंडळी हाताला किंवा पायाला फुट कॉर्न्स असतील, बाजारात सहज उपलब्ध असणारी फुट कॉर्न्स कॅप लावूनही फारसा फरक पडलेला नसेल तर हीउपाय करून पहा.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती