आरोग्य मंत्रा

दररोज खा काळे हरभरे; होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

जेव्हा आपण प्रथिनांबद्दल बोलतो तेव्हा लोकांचे लक्ष दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी पदार्थांकडे जाते. परंतु, आपल्या स्वयंपाकघरात अशा काही कडधान्य आधारित गोष्टी असतात ज्या प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Black Gram Benefits : अनेकदा जेव्हा आपण प्रथिनांबद्दल बोलतो तेव्हा लोकांचे लक्ष दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी पदार्थांकडे जाते. परंतु, आपल्या स्वयंपाकघरात अशा काही कडधान्य आधारित गोष्टी असतात ज्या प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत आणि त्याचे रोज सेवन केल्याने शरीराला कॅल्शियम, प्रथिने मिळतात. कार्बोहायड्रेट्स सारख्या आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता होते. त्याचप्रमाणे काळा हरभरा हा आपल्या स्वयंपाकघरातील सुपर इन्ग्रिडेंट आहे, त्यातील मूठभर उकळून रोज खाल्ल्यास आपले शरीर लोखंडासारखे मजबूत होईल.

प्रथिने

काळे उकडलेले हरभरे वनस्पती-आधारित प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जो स्नायूंना दुरुस्त करतो आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

फायबरचे प्रमाण अधिक

काळ्या उकडलेल्या हरभऱ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनास मदत करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते तसेच आतड्या निरोगी ठेवते.

जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत

काळ्या उकडलेल्या हरभऱ्यामध्ये जीवनसत्त्वे (जसे की बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन डी), लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात, ज्यामुळे शरीर आतून मजबूत होते.

एनर्जी वाढवते

भरपूर कार्बोहायड्रेट्स असल्याने काळ्या उकडलेल्या हरभऱ्यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि दिवसभर काम करूनही थकवा जाणवत नाही.

हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन

काळ्या उकडलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.

हाडांच्या आरोग्यास मदत

काळ्या उकडलेल्या हरभऱ्यामध्ये आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हाडांचे आरोग्य राखण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करण्यास मदत करतात.

त्वचा आणि केस

काळ्या उकडलेल्या हरभऱ्यामध्ये असलेले पोषक तत्व कोलेजन तयार करून आणि पेशींची दुरुस्ती करून त्वचा, केस आणि नखे निरोगी बनवतात.

Sham Saner Shindkheda Assembly constituency: शाम सनेर यांची शिंदखेडा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी, महायुती व महाविकास आघाडीचे आव्हान

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला काळं फासलं

Kalyan Uddhav Thackrey On Ajit Pawar: अजितदादांना आशिर्वाद अखंड उपमुख्यमंत्री भव; ठाकरेंचा दादांना टोला

'व्होट जिहाद'वरून शरद पवारांंचे फडणवीसांसह भाजपला जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Updates live: मला सोडून गेलेले पुन्हा कधी निवडून येत नाहीत; शरद पवार