आरोग्य मंत्रा

तुम्ही कधी बदामाचा चहा ट्राय केलायं का? 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

आतापर्यंत आपण आलं, तुळस, दालचिनी, गुलाब चहा, ग्रीन टी इत्यादी विविध प्रकारचे चहा प्यायलं आहोत. पण, तुम्ही कधी बदामाचा चहा प्यायला आहे का?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Almond Tea Benefits : आतापर्यंत आपण आलं, तुळस, दालचिनी, गुलाब चहा, ग्रीन टी इत्यादी विविध प्रकारचे चहा प्यायलं आहोत. पण, तुम्ही कधी बदामाचा चहा प्यायला आहे का? बदामाचा चहा पिण्याने अनेक आरोग्य फायदे होतात. चला बदामाचा चहा पिण्याचे फायदे आणि ते कसे बनवावे ते जाणून घेऊया.

बदामाचा चहा पिण्याचे फायदे

1. फायबर, मोनोसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक बदामामध्ये आढळतात. हे सर्व घटक संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

2. बदामाचा चहा प्यायल्याने रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे रक्षण होऊ शकते. या रॅडिकल्समुळे सुरकुत्या, डागांची समस्या होतात. बदामाचा चहा पिल्यास या समस्यांपासून आराम मिळू शकतो. म्हणजेच एकंदरीत ते तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवते.

3. बदामाचा चहा प्यायल्यानेही शरीर डिटॉक्सिफाय होते. यामुळे शरीरातील साचलेली घाण निघून जाते आणि हानिकारक रोग आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

4. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करू शकतात. सांधेदुखीसारख्या जुनाट आजाराचा धोकाही कमी होतो. त्यामुळे शरीराचा थकवा आणि अशक्तपणाही दूर होतो.

5. बदामाचा चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळीही याद्वारे नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे टाइप टू मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते.

6. संशोधनात असे आढळून आले आहे की हा चहा नियमितपणे प्यायल्याने यकृत योग्यरित्या कार्य करते. त्यामुळे किडनीचे आरोग्य देखील सुधारते. यामुळे मेटाबॉलिज्म बरोबर राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

बदामाचा चहा कसा बनवला जातो?

बदामाचा चहा बनवण्यासाठी 10 ते 12 बदाम तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर बदामाचे सालं काढून टाका. आता सोललेले बदाम मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. भांड्यात एक कप पाणी घाला. पाणी उकळायला लागल्यावर त्यात बदामाची पेस्ट घाला आणि हे मिश्रण 10 ते 12 मिनिटे शिजू द्या. आता मिश्रण आचेवरून उतरवा. ते गाळून घ्या आणि चवीनुसार अर्धा चमचा मध घाला.

मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी

Nilesh Rane : निलेश राणे आज शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 100 जागा लढणार? सुप्रिया सुळेंच्या 'या' विधानानं चर्चांना उधाण

भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का; भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?