आरोग्य मंत्रा

गर्भसंस्कार बाळाच्या विकासासाठी महत्त्वाचे, जाणून घ्या फायदे

आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग अर्थातच गर्भ संस्काराचा. गर्भसंस्कार फक्त प्रेग्नन्सीतच नाही तर गर्भधारणा होण्याच्या आधीपासून करायचे असतात.

Published by : Team Lokshahi

आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग अर्थातच गर्भ संस्काराचा. गर्भसंस्कार फक्त प्रेग्नन्सीतच नाही तर गर्भधारणा होण्याच्या आधीपासून करायचे असतात. क्षणभरासाठी कल्पना करा की, आपल्या घरी कोणी तरी महत्त्वाचे पाहुणे येणार आहेत. पाहुणे आल्यावर आपण त्यांना काय हवं, काय नको हे पाहणार असतोच. पण त्यांच्या स्वागताची तयारी, आपण ते घरी येण्यापूर्वीच करून ठेवलेली असते, नाही का? त्यांना आवडणारे पदार्थ तयार करून ठेवलेले असतात, एखादी भेट वस्तू आणून ठेवलेली असते, घर नीट आवरून ठेवलेला असतं. समजा पाहुणे घरात आल्यावर, जर का आपण हे सगळं करायला गेलो तर तो काही खरा पाहूणचार ठरणार नाही. बरोबर? दोन दिवसांसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी जर आपण इतके तपशिल राहतो, तर घरात जन्माला येणारं बाळ हे अख्ख्या परिवाराचा जीव का प्राण होणार असतं. मग या लाडक्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी आई-वडलांनी आधीपासूनच नको का करायला?

बीज संस्कारांमध्ये नेमकी ही तयारीच करायची असते. यामुळे एक तर, गर्भधारणा होण्यास मदत मिळते. मुळातलं बीज शक्ती संपन्न असलं, की गरोदारपणामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. गर्भवती स्त्रीचं आरोग्य चांगलं राहतं. नऊ महिने नऊ दिवस, भरल्यानंतर प्रसूती होण्याचे आणि सामान्य प्रसूती होण्याच्या शक्यता वाढतात. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात अनुवंशिक त्रास असले तर ते टाळता येतात. गर्भसंस्कार क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा जास्त काम करताना अनेकदा आलेला एक अनुभव म्हणजे,

समजा पहिल्या आपत्याला सतत सर्दी, खोकला, ताप होण्याचा त्रास असेल आणि दुसऱ्या वेळेला जर आई-वडिलांनी सुरुवातीपासून बीजसंस्कार, गर्भसंस्कार करून घेतलेले असतील, तर धाकट्या अपत्याला सारखा सारखा सर्दी, खोकला होत नाहीकिंवा जर आई-वडील दोघांनाही त्यांच्या लहान वयात चष्मा लागलेला असेल आणि त्यांनी जर बीजसंस्कार केले, गरोदारपणामध्ये विशेष काळजी घेतली, तर त्यांना होणाऱ्या बाळाला डोळ्याचा कोणताही त्रास नसतो. अशी एक-दोन नाही, तर अनेक उदाहरणं आजपर्यंत आम्ही अनुभवलेली आहेत, आयुर्वेदात सांगितलेले बीज संस्कार किती महत्त्वाचे आहेत याची प्रचिती घेतलेली आहे. बाळ हवं असणाऱ्या प्रत्येक दाम्पत्यानी याचा अनुभव घ्यायलाच हवा.

मनसेच्या अमित ठाकरेंकडून उद्या मेळाव्याचं आयोजन, प्रचाराचं रणशिंग फुंकणार

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

Bhaskar Jadhav on Shivsena UBT Candidate List: भास्कर जाधवांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले जाधव

Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया