आरोग्य मंत्रा

Control "PCOS" problems: या गोष्टी करून तुम्ही "PCOS"च्या समस्यांना नियंत्रित करू शकता

या अनियमित हार्मोन्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी हर्बल टी खूप फायदेशीर ठरत असल्याचं समोर आलंय. तुम्हालाही PCOS ची समस्या असेल तर हा नैसर्गिक चहा फायदेशीर ठरू शकतो.

Published by : Team Lokshahi

अलीकडच्या काळात तरुणींमध्ये "पीसीओएस" ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसतेय. वैद्यकीय भाषेत PCOS ला Polycystic Ovary Syndrome असंही म्हटलं जातं. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन जेव्हा बिघडतं त्यावेळी पीसीओएस ही समस्या झपाट्याने वाढते.

या समस्येत महिलांमध्ये पुरुष हार्मोन्स म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते आणि इस्ट्रोजेनचे उत्पादन कमी होते. पीसीओएसमध्ये महिलांना शरीरावर नको असलेले केस, अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर विशेषत: गालावर पिंपल्स, मूड स्विंग यासोबतच चिंता, ताण-तणाव आणि पोटाच्या खालची चरबी यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

या अनियमित हार्मोन्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी हर्बल टी खूप फायदेशीर ठरत असल्याचं समोर आलंय. तुम्हालाही PCOS ची समस्या असेल तर हा नैसर्गिक चहा फायदेशीर ठरू शकतो.

पुदिना चहा(Mint Tea)

जर तुम्ही उच्च टेस्टोस्टेरॉन, हर्सुटिझम आणि ओव्हुलेशनच्या समस्येचा सामना करत असाल तर, सुपरमिंट चहा तुमच्या दिनचर्येत चांगली भर घालू शकतो. हा चहा एन्ड्रोजन कमी करून ओव्हुलेशनला प्रोत्साहन देतो रोज सकाळी रिकाम्या पोटी पुदिना चहा पिल्याने अनेक फायदे होतात.

हिरवा चहा (Green Tea)

पीसीओएसने ग्रस्त असलेल्या तसंच ज्यादा वजन आणि लठ्ठ महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यात ग्रीन टी योगदान देते. अशा परिस्थितीत तुम्ही सामान्य चहाऐवजी या आरोग्यदायी चहाला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.

आल्याचा चहा(Ginger Tea)

आलं हे महिलांच्या शरीरात असलेल्या हार्मोन्सचे नियमन करण्याचे काम करते. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे PCOS मुळे पायाला गोळे येणे, मूड स्विंग आणि डोकेदुखी यांसारख्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही हा आल्याचा चहा पिऊ शकता. याशिवाय अतिरिक्त फायद्यासाठी तुम्ही त्यात लिंबू किंवा मधही घालू शकता.

दालचिनी चहा (Cinnamon Tea)

दालचिनी तुमची वाढलेली रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते. यासोबतच वजन कमी करण्यास आणि मासिक पाळी नियमित करण्यासही दालचिनीच्या चहाची मदत होते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी