आरोग्य मंत्रा

Monsoon: पावसाळ्यात या फळांचे आवर्जून सेवन करा

पावसाळ्याच्या दिवसात पावसाळी फळांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात नक्की करावा. पावसाळ्याच्या दिवसात पचनक्रिया मंद झालेली असते. या दिवसात चांगला आहार घेणे फार गरजेचे आहे.

Published by : Team Lokshahi

पावसाळा हा जितका आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारा ऋतू आहे, तितकाच चिंताजनकही आहे. कारण पावसाळ्यात सर्वात जास्त साथीचे रोग, इनफेक्शन, अ‍ॅलर्जी होतात. पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे जीवजंतू पोसले जातात. शिवाय या काळात तुमची पचनशक्ती मंदावलेली असते. अशा काळात आजारपणे येण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यात आहारात फळांचा समावेश करताना काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या. या काळात पिकणारी ताजी आणि सीझनल फळं तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकतात.

1. डाळींब

डाळिंबामध्ये भरपूर पोषक घटक आणि अँटि ऑक्सिडंट्स असतात. आजारपणातून बाहेर पडण्यासाठी, आजारपण दूर ठेवण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात तुम्ही डाळींब नक्कीच खाऊ शकता. शिवाय यातील व्हिटॅमिन बीमुळे शरीरातील लाल रक्त पेशी वाढण्यास आणि रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.

2. लिची

लिचीमध्ये भरपूर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनच्या समस्या अथवा अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत होते. ज्यामुळे सर्दी खोकला अथवा ताप येत नाही. पावसाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यासाठी लिची फायद्याची ठरते.

3. जांभूळ

उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला तुम्हाला जांभळांची फळंही सहज मिळतात. जांभळामध्ये व्हिटॅमिन्स, पोटॅशिअम, फॉलेट, लोह भरपूर असतं. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत होते.

4. सफरचंद

सफरचंद हे बारा महिने मिळणारं फळ आहे. आरोग्यासाठी सफरचंद खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. कारण सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, सी तसंच फॉस्फसर, लोह, आयोडिन, कॅल्शिअम अशतं. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमचं आजारपणापासून संरक्षण होतं.

फळं खाणं नेहमीच आरोग्यासाठी हितकारक असतं. मग पावसाळा असो वा कोणताही ऋतू फळं आहारात असायलाच हवी. फक्त पावसाळ्यात फळं खाताना ती ताजी आणि स्वच्छ धुतलेली असतील याची काळजी घ्यायला हवी. कारण फळांवर असलेल्या जीवजंतुंमुळे आजारपण पसरण्याची जास्त शक्यता असते.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का