आरोग्य मंत्रा

Ayurvedic Inhaler: पावसाळ्यात सर्दीमुळे झोप लागत नाही? घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक इन्हेलर

Published by : Team Lokshahi

-डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

पावसाळ्यात सगळ्यांना एकदा तरी सर्दी होतेच. गंमत म्हणजे सर्दी झाली की बरं तर वाटत नाही, पण अगदी झोपून राहावं असंही वाटत नाही आणि आपली अगदी धांदल उडते. त्यातून नाक चोंदलं की जीव अगदीच कासावीस होतो. कित्येक जण अशावेळी इन्हेलर वापरतात किंवा कुठले तरी ड्रॉप्स टाकतात पण त्यामुळे एकतर तात्पुरतं बरं वाटतं आणि दुसरं म्हणजे याचे साईड इफेक्टसही खूप असतात. त्यामुळे घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक इन्हेलर.

आयुर्वेदिक इन्हेलरसाठी लागणाऱ्या पाच गोष्टी पुढील प्रमाणे:

ओवा

दालचिनी

वेलची

तमालपत्र आणि

कापूर

आयुर्वेदिक इन्हेलर बनवण्याचा कृती:

दोन चमचे ओवा मंद आचेवर भाजून हाताने थोडा कुस्करून घ्या. एक इंच दालचिनी, दोन-तीन वेलची आणिथोडंसं तमालपत्र खलबत्त्यात घेऊन जाडसर कुटून घ्या. यानंतर यातच थोडा कापूर मिसळा. हे सगळं मिश्रण सुती कापडात बांधलं की तयार झाला आपला आयुर्वेदिक इन्हेलर.

जाणून घ्या आयुर्वेदिक इन्हेलर फायदे:

हा इन्हेलरसुगंधी तर असतोच पण यामुळे सर्दी कमी होते, नाक मोकळं व्हायला मदत मिळते आणि मुख्य म्हणजे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही होत. लहान मुलांसाठी सुद्धा ही पोटली वापरता येते. सायनोसायटीस, खोकल्यामुळे कफ साठला असला तर या पोटलीचा शेक सुद्धा करता येतो. घरात कोणालाही सर्दी झाली तर रेडीमेड इन्हेलरच्या ऐवजी हा आयुर्वेदिक इन्हेलर नक्की वापरून पहा.

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...