आरोग्य मंत्रा

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

डोळ्याखालील ब्लॅक सर्कल्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा. आपल्या चेहऱ्याला ताजेतवाने बनवा आणि नैसर्गिक सौंदर्य वाढवा.

Published by : Team Lokshahi

ही समस्या त्वचेशी संबंधित आहे असं वाटलं तरी या त्रासाचं मूळ शरीराच्या आत आणि आपल्या चुकीच्या खाण्या-वागण्यात असतं. खूप मानसिक ताण असला, झोप कमी होत असली, शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असलं, परिश्रम खूप होत असलं, खाल्लेल्या अन्नाचं नीट शोषण होत नसलं तर डोळ्याखाली काळं होतं असं दिसून येतं.

डोळ्याखालील ब्लॅक सर्कलवर हमखास उपाय

त्यामुळे रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीमध्ये पुरेशी म्हणजे किमान सात ते साडेसात तास झोप मिळेल याकडे लक्ष ठेवायला हवं. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात डाळिंब, काळ्या मनुका, खजूर आणि तूप, अंजीर यांचा समावेश करणं चांगलं. सध्या बाजारात ताजे आवळे मिळतात त्यामुळे रोज एक आवळ्याचा रस, त्यात खडीसाखर, तूप आणि मध मिसळून घेण्याचाही तुम्हाला उपयोग होईल.

जेवताना दोन- दोन चमचे साजूक तूप घेणं, आहार प्रकृतीनुरूप घेणं, दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजं गोड ताक, त्यात पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चिमूटभर सैंधव टाकून घेणं, हे पचन सुधारण्यासाठी, पर्यायानी अन्नाचं शोषण होण्यासाठी मदत करणारं असल्यानी याचाही तुम्हाला उपयोग होईल. दिवसातून एकदा बंद डोळ्यांवर थंड दुधात भिजवलेल्या कापसाच्या घड्या ठेवण्यानी सुद्धा डोळ्याखालचं काळं कमी होण्यास मदत मिळेल.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण कमी होण्यासाठी, विचारांची भिरभिर कमी होण्यासाठी रोज थोडा वेळ योगासाठी, ध्यानासाठी काढणं हे सुद्धा आवश्यक. कमीत कमी पाच मिनिटांसाठी ज्योती ध्यान करण्याचा आणि शांतपणे बसून ओंकार ऐकण्याचा किंवा म्हणण्याचा उत्तम उपयोग होईल. हे सर्व उपचार घरच्या घरी सुरु करता येतील, तरीही गरज असल्यास तज्ञ वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं कधीही चांगलं.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती