आरोग्य मंत्रा

Women's Health: बाळंतशोप वनस्पतीचे स्त्री आरोग्यासाठी अद्भुत फायदे; जाणून घ्या...

बाळंतशोप हा शब्द आपल्या सर्वांना माहिती असेल. बाळंतशोपही एकंदर स्त्री आरोग्यासाठी सुद्धा एक गुणकारी वनस्पती आहे.

Published by : Team Lokshahi

बाळंतशोप हा शब्द आपल्या सर्वांना माहिती असेल. यातल्या बाळंत शब्दामुळे सहसा ही शोपफक्त बाळंतिणीसाठी असते असा समज होऊ शकतो. पण बाळंतशोपही एकंदर स्त्री आरोग्यासाठी सुद्धा एक गुणकारी वनस्पती आहे. शेपूच्या भाजीचं बी म्हणजे बाळंतशोप. ही बडीशोपेपेक्षा चवीला थोडी तीक्ष्ण असते आणि गर्भाशयाची शुद्धी करणारी असते. पाळी मध्ये अंगावरून कमी जात असेल, रक्तस्राव काळसर रंगाचा असेल, चिकटपणा किंवा गुठळ्या पडत असतील आणि पोट, कंबर, मांड्या दुखत असतील, पाळीचे चार दिवस अक्षरशः झोपून राहावं लागत असेल, किंवा पेनकिलर गोळी घ्यावं लागत असेल तर त्यावर बाळंतशोप औषध म्हणून घेता येते.

चांगल्या प्रतीची बाळंतशोप आणून मिक्सरच्या मदतीनी तिची पावडर करून ठेवावी. मासिकपाळीच्या आधी एक आठवडा हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा आणि संध्याकाळी अर्धा चमचा या प्रमाणात घेण्यास सुरुवात करावी.याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी ओटीपोटाला नारायण तेल किंवा बलातेलासारखं सिद्ध तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीनी शेक करावा. दोन-तीन महिन्यात या उपायाचा उपयोग झालेला दिसून यायला हवा, अन्यथा तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं चांगलं.

गर्भाशयावर काम करत असल्यामुळे सगळ्याच स्त्रियांनी आहारात अधून मधून बाळंतशोप घेणं चांगलं असतं. या दृष्टीने बडिशोप, ओवा, बाळंत शोप, धण्याची डाळ वगैरे गोष्टी एकत्र करून बनवलेली सुपारी जेवणानंतर घेता येते. मासिकपाळी दररोज यावेत, त्या दरम्यान काही त्रास होऊ नये, रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांच्या जीवनातील मासिकपाळी बंद होतो तो काळ त्या काळामध्ये त्रास होऊ नये यासाठी बाळंतशोपअधून मधून सेवन करणं हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम होय.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी