मोहरीच्या बियांमध्ये उपचारात्मक गुणधर्म असतात. जे तुमचे आरोग्य नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे तुम्ही त्यांचा वापर तुमच्या शरीराला विविध विकारांपासून वाचवण्यासाठी करू शकता.
सांधेदुखीमुळे तुम्ही त्रस्त असल्यास, मोहरीच्या तेलामध्ये कापूर घालून गरम करावे. त्यानंतर त्याने मालिश केल्यास, आराम मिळेल.
बद्धकोष्ठ असल्यास, त्यापासून सुटका मिळण्यासाठी एक चमचा मोहरी दिवसातून दोन ते तीन वेळा खावी. यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास थांबतो.
डोके दुखत असल्यास आणि मायग्रेन असल्यास, अर्धा चमचा मोहरी पावडर, 3 चमचा पाण्यात घालून नाकावर लावावे.
मोहरीचे दाने वाटून मधाबरोबर चाटण चाटल्यास कफ, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळेल.
मोहरी खाल्ल्यामुळे हृदयाशी संबंधित कोणतेही रोग कमी होण्याची शक्यता वाढते.