रवी जयसवाल: महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर कार्यकर्त्यांचं असलेलं प्रेम सातत्याने विविध घटनांमधून आपल्याला पाहायला मिळत असतं. बऱ्याचदा एखादी नवी गाडी खरेदी केल्यानंतर कार्यकर्त्यांची अशी इच्छा असते की, आपल्या नेत्याने सर्वात आधी ती गाडी चालवावी व त्या गाडीचा शुभारंभ करावा. असाच एक किस्सा जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत घडली आहे.
जालना येथे एका कार्यकर्त्याने आणलेल्या नव्या बुलेट चा शुभारंभ करताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बुलेट चालवण्याचा मोह आवरला नाही. रांजणी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेख यांनी नवीन बुलेट घेतली. मात्र, त्याचा शुभारंभ आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करायचा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळं टोपे यांच्या निवासस्थानी त्यांनी बुलेट घेऊन आले.. यावेळी टोपे यांनी आपल्या घरासमोरच बुलेटवर फेरफटका मारला, यावेळी कार्यकर्त्यानी हा प्रसंग आपल्या मोबाईल मध्ये कैद केलाय.