Crime

भिवंडीत २१ लाखांचा गुटखा जप्त, एकाला पोलिसांनी केले गजाआड..

Published by : Lokshahi News


अभिजित हिरे | भिवंडी तालुक्यात २१ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात टेम्पो चालक महादेव हनुमंत भोसले याला अटक केली आहे. महादेव हनुमंत भोसले यांना ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


भिवंडी तालुक्यात पिंपळास येथील आर.के.जी गोडाऊन येथुन घेवून जाण्यासाठी एक आयसर टेम्पो येणार असल्याची खात्रीशीर माहिती कोनगाव पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवताच अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव व सहकाऱ्यांनी कोनगावचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणपतराव पिंगळे यांच्या सह गोडाऊनवर धाड टाकुण टेम्पोतील २१ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा विना लेबल प्लॅस्टीकची एकुण ४७ मोठी पोती, त्यामध्ये केसरयुक्त प्रिमीयम क्वॉलिटीचे एकुण १५,१८० प्रतिबंधीत गुटख्याचे पॅकेट व ८ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण २९ लाख ८५ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालक महादेव हनुमंत भोसले वय ४२ यास अटक केली. दरम्यान मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पराग भाट हे करीत आहेत.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha