गुगलने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमिताचे औचित्य साधत भारतातील दहा लाख महिला उद्योजकांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये भारतासह जगातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी 2.5 कोटी डॉलर्स देण्याची घोषणा केली. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली.
Google ने भारतातील ग्रामीण भागातील 10 लाख महिलांना उद्योगासाठी कंपनी मदत करणार असल्याचं सांगितलं. कंपनीने यासाठी Women Will वेब व्यासपीठही निर्माण केले आहे. अद्यापही अनेक महिलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध नाही, ते या अभियानाच्या मदतीने त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत.
इंटरनेट साथी 2015 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. गुगल इंडियाचे भारतातील मॅनेजर आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी कंपनीच्या या अभियानाची सुरुवात केली होती, इंटरनेट साथीमध्ये आता 80 हजार स्वयंसेवक आहेत, हा कार्यक्रम देशातील 3 लाख गावांपर्यंत पोहोचलाय.