आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढीमुळे देशांतर्गत पातळीवर सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढलेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 170 रुपयांनी वाढली. त्याचबरोबर या काळात चांदीच्या दरात 172 रुपयांनी वाढ झाली. जगभरातील शेअर बाजारांमध्ये खरेदीचा टप्पा सुरू असल्याने येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा कल सोन्यापासून शेअर बाजाराकडे वळलाय.
सोन्याची नवी किंमत
मंगळवारी दिल्लीमध्ये 99.9 टक्के असलेल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,374 रुपयांवरून 46,544 रुपये झाली. यादरम्यान किमती 170 रुपयांनी वाढल्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत $1801 प्रति औंस झाली.
चांदीची नवी किंमत
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. दिल्लीच्या सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 61,412 रुपयांवरून 61,584 रुपये झाली. या दरम्यान किमतीमध्ये 172 रुपयांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीची किंमत 23.60 डॉलर प्रति औंस झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मागणी वाढल्याचा परिणाम चांदीच्या किमतींवर दिसून आला.