Marathwada

महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार थांबण्यासाठी हिंगोलीत ‘गाव तिथे जनजागृती’ अभियान

Published by : Shweta Chavan-Zagade

गजानन वाणी | राज्यामध्ये बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या (Child sexual abuse) घटना वाढत असल्याने हिंगोली (Hingoli) पोलिसांनी गाव तिथे जनजागृती अभियान मोहीम हाती घेतली. हिंगोलीच्या बरडा या गावापासून आज सुरुवात केली.  महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual abuse of women and children) रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावागावामध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सेनगाव तालुक्यातील बरडा गावात आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual abuse of women and children) कार्यशाळेत केले.

रात्री उशिरा बरडा गावातील चिमुकल्यांसाठी व महिलांसाठी पोलीस दलाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रफितीच्या माध्यमातून बालकांवरील होणारे अत्याचार या संदर्भात जनजागृती मोहीम राबवली. यावेळी मोठ्या संख्येने महिला बालकासह नागरिक उपस्थित होते. महिला व बालकांवरील होणारे अत्याचार अन्याय कमी करण्यासाठी गाव तिथे जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय हिंगोली पोलीस दलाने घेतलाय. हिंगोली,जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे,यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय