Uttar Maharashtra

गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Published by : Team Lokshahi

तरुण पिढी सह सर्वांसाठीचे हे प्रेरणास्थान असल्याचा गौरव

पूज्य बापूंच्या स्मरणार्थ बांधलेले गांधी धाम (Gandhi Dham) हे भारतातील पाचवे धाम असल्याचे दिसते. बापूंचे जीवन आणि जीवन दृश्य येथे चित्रित केले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेऊ शकतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात. श्री भवरलाल जैन (Bhavarlal Jain) यांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. बापूंच्या चरणी विनम्र अभिवादन! अशी लिखीत प्रतिक्रिया महाराष्ट्राचे (maharashtra) महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyar) यांनी नोंदविली. महामहीम राज्यपाल यांनी जैन हिल्सस्थित (Jain Hills) गांधीतीर्थ ला भेट दिली. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे (Jain Irrigation) अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे (Gandhi Research Foundation) संचालक अशोक जैन (Ashok Jain), डॉ. सुदर्शन आयंगार (Dr. Sudarshan Iyengar) यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन (Atul Jain )सोबत उपस्थित होते.

संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. त्यांचे हे कार्य पाहून माननीय राज्यपाल भारावले. जगातिल सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम खोज गांधीजी की या संग्रहालयास महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुमारे तासभर भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी राज्यपाल महोदयांचे सुतीहार देऊन स्वागत केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.

गांधी तीर्थ साकारतांना भवरलालजी जैन यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकरी तसेच देशाचा, तरुणाईच्या भल्याचा विचार केला. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थची निर्मिती केली. या माध्यमातून युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते. त्यादृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दीष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का