देशात इंधन दरवाढीने (fuel price hike) सर्वसामान्य बेजार झाले असताना आता चांगली बातमी आली आहे. देशातील रस्त्यांवर हायड्रोजन कार (Hydrogen car) लवकरच धावणार आहे. बहुप्रतीक्षित पहिली हायड्रोजन कार भारतात (Hydrogen car india) दाखल झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Union Minister Nitin Gadkari) बुधवारी या गाडीतून प्रवास केला आहे.
ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर (Hydrogen based Fuel Cell Electric car) चालणारी भारतातील पहिली कार काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. या मिराई (Toyota Mirai) कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. आज संसदेत जाताना नितीन गडकरींनी याच कारने प्रवास केला.
काय आहे ग्रीन हायड्रोजन
ग्रीन हायड्रोजनच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ही कार आधारीत असून या कारचं नावही विशेष आहे. कारण जापानी भाषेत मिराईचा (Mirai) अर्थ भविष्य असा असल्याने ही कार वाहनांचं भविष्यचं म्हणावी लागेल. मिराई कार टोयोटा कंपनी आणि किर्लोस्कर (Toyota Kirloskar) यांनी मिळून तयार केली आहे.ग्रीन हायड्रोजन चांगला पर्याय आहे. ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाण्यापासून निघणारं हायड्रोजन. त्यावर गाडी सहज चालतेय. याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल. त्यामुळे आगामी काळात हायड्रोजन कार क्रांतिकारक ठरू शकेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितले.