बँकिंग सेवा वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे . तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर यावरील शुल्कासंदर्भात आरबीआयकडून (RBI) एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे.
हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या मते, इंटरचेंज शुल्क ग्राहकाने क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास मर्चंट बँकेला लागू होतात. कार्ड इशू करणारी बँक इंटरचेंज फी पे करते.